महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाईन गेममुळे पालकांना भुर्दंड; औरंगाबादमध्ये एकास ३२ हजारांचा फटका

सुरुवातीला सायबर चोरांनी चोरी केल्याचा संशय आला. त्यानुसार पोलीसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली. त्यात त्यांच्याच मुलाने मोबाईलवर गेम खेळल्याने पैसे गेल्याच समोर आले आहे.

ऑनलाईन गेममुळे पालकांना भुर्दंड
ऑनलाईन गेममुळे पालकांना भुर्दंड

By

Published : Feb 3, 2021, 4:22 AM IST

Updated : Feb 3, 2021, 6:28 AM IST

औरंगाबाद - मुले मोबाईलवर गेम खेळत असतील तर सावध व्हा, कारण त्याचा फटका आपल्याच खिशाला बसू शकतो. तुमचे पैसे ऑनलाईन चोरले जाऊ शकतात. औरंगाबादेत नुकतेच अशा प्रकारचे एक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने जवळपास 32 हजार रुपये कट झाले आहेत. माधव रेड्डी असे त्या पालकाचे नाव आहे.

ऑनलाईन गेममुळे पालकांना भुर्दंड
सुरुवातीला ऑनलाईन फसवणुकीचा आला संशय....

औरंगाबादेत एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या माधव रेड्डी यांच्या बँक खात्यातून मागील काही महिन्यांपासून पैसे कट होत होते. कधी संध्याकाळी, तर कधी मध्यरात्री.. कधी हजार रुपये, तर काही दीड हजार रुपये खात्यात कपात झाल्याचे मेसेज त्यांना आले. बँकेने काही पैसे लावले असतील म्हणून त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा पैसे कपात व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला सायबर चोरांनी चोरी केल्याचा संशय आला. त्यानुसार पोलीसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली. त्यात त्यांच्याच मुलाने मोबाईलवर गेम खेळल्याने पैसे गेल्याच समोर आले आहे.

ऑनलाईन गेममुळे 32 हजारांचे नुकसान....

कोरोनाकाळात शाळा बंद झाल्याने शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याकडे कल दिसुन आला. त्यामुळे लहानमुलांच्या हातात अगदी सहज मोबाईल उपलब्ध झाला. मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास करत असताना अनेकवेळा गेम आणि इतर संदर्भात जाहिराती प्रकाशित होतात. आशा वेळी आवडत्या गेमची जाहिरात प्रसारित झाली तर ती पाहण्याचा मोह मुलांना आवरत नाही. ती जाहिरात पाहताना गेम डाउनलोड होतो. तो गेम खेळताना तो ऑनलाईन आहे का? ऑफलाईन हे मुलांना कळत नाही. त्यातच ऑनलाईन गेम असेल तर त्याचे पैसे मात्र कट होतात. तसाच प्रकार औरंगाबादच्या माधव रेड्डी यांच्या मुलाच्या बाबतीतही घडला आणि तब्बल 32 हजारांचे नुकसान झाले.

यूपीआय लिंक असेल तर होते नुकसान

ऑनलाईन व्यवहार करताना आपल्या मोबाईलमध्ये काही अॅप्लिकेशन आपण डाउनलोड करतो. हे अॅप्लिकेशन वापरत असताना बँकेचे खाते लिंक केले जाते. आर्थिक उलाढाल करताना सोपा असलेला उपाय काहीवेळा हानिकारक ठरतो आणि काहीवेळा अनावश्यक असलेले व्यवहार अनावधानाने होतात. त्याचा भुरदंड बसतो. त्यात लहान मुलांच्या हातात मोबाईल असल्यावर काही ऑनलाईन पद्धतीचे गेम खेळले जातात आणि नकळत आपल्या खात्यातून पैसे वळती होतात आणि आपल्याला कळत नाही. त्यामुळे मोबाईल ऑनलाईन पेमेंट अप्लिकेशन वापरताना आपल्या बँकेचे खाते लिंक करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने पैसे वळती होण्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देताना सतर्क राहावे, असेही आवाहन औरंगाबाद पोलिसांनी केले आहे.

Last Updated : Feb 3, 2021, 6:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details