औरंगाबाद- शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज शनिवारी सकाळी आणखी 30 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 872 वर पोहोचली आहे, तर गेल्या २४ तासांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
औरंगाबादेत नव्या ३० रुग्णांची भर, कोरोनाबाधितांचा आकडा ८७२ वर - औरंगाबाद कोरोना पॉझिटिव्ह केसेस
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे, तर घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत औरंगाबाद शहरातील नवीन हनुमान नगर येथील 74 वर्षीय, बायजीपुरा येथील 70 वर्षीय, शहानूर मियाँ येथील 57 वर्षीय आणि हिमायत नगर येथील 40 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
औरंगाबादेत नव्या ३० रुग्णांची भर, कोरोनाबाधितांचा आकडा ८७२ वर
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे, तर घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमान नगर येथील 74 वर्षीय, बायजीपुरा येथील 70 वर्षीय, शहानूर मियाँ येथील 57 वर्षीय आणि हिमायत नगर येथील 40 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 25 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
शहरात आज आढळलेले रुग्ण -
परिसर | रुग्ण |
एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय | ०३ |
हनुमान चौक, चिकलठाणा | ०१ |
राम नगर | ०३ |
एमआयडीसी | ०१ |
जालान नगर | ०१ |
संजय नगर, लेन नं.6 | ०३ |
सादात नगर | ०४ |
किराडपुरा | ०१ |
बजाज नगर | ०१ |
जिनसी रामनासपुरा | ०१ |
जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली क्र. ५ | ०१ |
जहागीरदार कॉलनी | ०१ |
आदर्श कॉलनी | ०१ |
रोशन गेट | ०१ |
अन्य | ०७ |
एकूण | ३० |