महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहनातून लाखोंची रोकड लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

बँकेतून रोकड काढणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेऊन त्यांच्या रोख रकमेवर डल्ला मारणाऱ्या उत्तर प्रदेशच्या कुख्यात टोळीला औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून कोल्हापुरातून अटक केली आहे.

चोरांसह पोलीस पथक

By

Published : Jul 7, 2019, 9:51 PM IST

औरंगाबाद- बँकेतून रोकड काढणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेऊन त्यांच्या रोख रकमेवर डल्ला मारणाऱ्या उत्तर प्रदेशच्या कुख्यात टोळीला औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून कोल्हापुरातून अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी


औरंगाबाद सह संपूर्ण महाराष्ट्रात वाहनाच्या डिक्कीत ठेवलेली रोकड मोठ्या शिताफीने लंपास करणाऱ्या कुख्यात विष्णू सिंग, संदीप सोनकर, सोनू सिंग (तिघे रा. उत्तर प्रदेश) या टोळीला कोल्हापुरातून गुन्हे शाखेने अटक केली आहे. औरंगाबादेतील हर्सूल, जय टॉवरसह उस्मानपुरा भागातून या टोळीने लाखो रुपयांची रोकड लंपास केले आहे. बँकेतून रोकड काढणाऱ्या व्यक्तीवर हे तिघेजण पाळत ठेवत असे, बँकेतून रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा दुचाकीवरून पाठलाग करून ज्या ठिकाणी ती व्यक्ती थांबते त्या ठिकाणी संधी साधून व्यक्तीच्या वाहनातून काही क्षणातच ही टोळी रोख रक्कम चोरून पोबारा करत असे. औरंगाबाद येथे अशाच प्रकारे एका दुचाकीतून रक्कम लंपास करीत असताना या टोळीतील दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते.

या फुटेजच्या आधारेवर पोलिसांनी खबऱ्याच्या मदतीने माहिती काढली असता ही टोळी उत्तरप्रदेश येथील असून ती टोळी कोल्हापुरात चोरी करण्याच्या उद्देशाने दडून बसल्याची माहिती औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने थेट कोल्हापूर गाठून पाळत ठेवत दुसऱ्या दिवशी सापळा रचून तिघांच्या मुसक्या आवळल्या.

हे तिघांचेही राहणीमान उच्च दर्जाचे असून तिघांना उच्च प्रतीच्या हॉटेल मध्ये राहण्याचा, उच्च प्रतीच्या दारू पिण्याचा शौक होता. चोरी केलेला पैसा हे तिघेही मौजमजा करत प्रेयसीवर उडवीत असल्याची माहिती समोर आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details