औरंगाबाद- कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यात धक्कादायक म्हणजे 244 नमुने जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी ( Genome Sequencing ) म्हणजेच ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी ( Omicron Test ) पाठविण्यात आले आहेत. अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. मात्र, ही धोक्याची घंटा समजावी लागेल यात शंका नाही.
औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई ( Minister Subhash Desai ) यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 3 जानेवारी) पार पडली. या बैठकीत त्यांनी कोरोना विषयक उपाययोजनांचा, ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister Raosaheb Danve ), रोहयो मंत्री संदीपान भूमरे ( Minister Sandipan Bhumre ), जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळेक, पोलीस आयुक्त डॉ. निखीलकुमार गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व्यासपीठावर तर खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, हरीभाऊ बागडे, प्रशांत बंब, अतुल सावे, संजय शिरसाठ, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत तसेच इतर समिती सदस्य बैठकीस उपस्थित होते.
औरंगाबाद : जिल्ह्यातील 244 नमुने जिनोम सिक्वेंन्सिंग तपासणीसाठी पाठवले - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यात धक्कादायक म्हणजे 244 नमुने जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी ( Genome Sequencing ) म्हणजेच ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी ( Omicron Test ) पाठविण्यात आले आहेत. अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. मात्र, ही धोक्याची घंटा समजावी लागेल यात शंका नाही.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणावर विशेष भर देण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच कोरोना चाचणीही मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहे. आज 244 नमुने जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल अद्याप झाला नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता यंत्रणा सक्षम आहे. जिल्ह्यात 360 रुग्णवाहिका तयार आहेत. 552 व्हेंटीलेटर बेड, 21 हजार 391 साधे बेड्स सज्ज आहेत. 25 पीएसए प्लॅन्टच्या माध्यमातून 21 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. कोविडमध्ये जीव गमावलेल्यांना शासन मदत करत असून जिल्ह्यात यासाठी 2 हजार 724 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 1 हजार 941 अर्ज मंजूर झाले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा -Raosaheb Danve on CM : 'मुख्यमंत्री आजारी असतील तर एकनाथ शिंदे किंवा राष्ट्रवादीला संधी द्या'