महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Brother Sexually Assaults Minor Sister : सख्ख्या भावाचा अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार; पीडिता गरोदर - गंगापूर पोलीस ठाणे

Brother Sexually Assaults Minor Sister : बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरात घडली. येथे एका वीस वर्षीय भावाने त्याच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 8:30 PM IST

छत्रपती संभाजीनगर : Brother Sexually Assaults Minor Sister :जीवे मारण्याची धमकी देत वीस वर्षीय सख्या भावानेच अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना गंगापूरमध्ये उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांच्या पथकानं आरोपीस मनमाड येथून अटक केली आहे.

अल्पवयीन पीडित बहिणीच्या तक्रारीवरुन भावाविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत - ज्ञानेश्वर साकळे, पोलीस उपनिरीक्षक

पीडित अल्पवयीन मुलगी रुग्णालयात दाखल : पीडित अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं वैद्यकीय तपासणीतून समोर आलंय. पीडित मुलीला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल :भावानं आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर गेल्या चार ते पाच महिन्यांत वारंवार अत्याचार केले. त्यातून पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिचे पोट दुखायला लागले असता, ९ ऑक्टोंबर रोजी आईनं तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी मुलगी गरोदर असल्याचं सांगितलं होतं.

मुलगी दोन महिन्याची गरोदर : त्यानंतर पोट जास्त दुखायला लागल्यानं तिला गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय तपासणीत मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याची बाब समोर आली. याबाबत गंगापूर पोलिसांनी २० वर्षीय तरुणाविरोधात बाल लैगिक अत्याचार प्रतिबधक (पोक्सो )कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, त्या तरुणाला मनमाड येथून अटक केली आहे.

हेही वाचा -

  1. Police Chased Caught The Criminal : पोलिसांनी एक किलोमीटर पाठलाग करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
  2. Boyfriend Private Parts Cut In Bihar : प्रेयसीनं थाप मारुन प्रियकराला बोलावलं घरी, ...आणि प्रियकराचं कापलं गुप्तांग
  3. Nagpur Crime News : अनैतिक संबंधाच्या संशयातून होमगार्डची हत्या, आरोपीला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details