महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैजापूरमधील १४ गावांना पाण्याचा वेढा; मदतकार्य सुरू

वैजापूर तालुक्यातील सरला बेट, वांजरगाव या परिसरात पाणी शिरले आहे. एनडीआरएफच्या जवानांनी जवळपास 138 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वैजापूर तालुक्यातील सरला बेट, वांजरगाव या परिसरात पाणी शिरले आहे.

By

Published : Aug 6, 2019, 11:13 AM IST

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील जवळपास 14 ते 15 गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाने गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे जवळपास दोन लाख क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आले. यामुळे वैजापूर तालुक्यातील सरला बेट, वांजरगाव या परिसरात पाणी शिरले आहे. एनडीआरएफच्या जवानांनी जवळपास 138 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वैजापूर तालुक्यातील सरला बेट, वांजरगाव या परिसरात पाणी शिरले आहे.

नाशिक भागातील धरणांमधून 90 हजार क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडी धरणाकडे येत असून, धरणातील 22 टक्के पाणीसाठ्यात भर पडली आहे. रविवारी (दि.४ ऑगस्ट) रोजी दुपारनंतर पाण्याचा ओघ वाढल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. गोदावरी नदीकाठच्या जवळपास 138 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पुढील काही तासात पाण्याचा ओघ कमी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details