अमरावतीत पावसासाठी युवकांचा घंटा नाद आणि जलाभिषेक - pray
मान्सून सुरू झाला असला तरी पावसाने मात्र जिल्हात दडी मारली आहे. यावर उपाय म्हणून वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी युवकांनी मंगळवारी रविनगर परिसरातील हनुमान मंदिराच्या आवारातील महादेवाला घंटा नाद जलाभिषेक केला आहे.
युवकांचा घंटा नाद आणि जलाभिषेक
अमरावती- जिल्ह्यात जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. पण, गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. पाऊस नाही म्हणून शेतकरी चिंतेत आहे. सोबतच पाऊस नसेल तर, पाणी टंचाईच्या समस्येला याही वर्षी सामोरे जावे लागेल का, हा प्रश्न देखील सर्वांना भेडसावत आहे. यावर उपाय म्हणून वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी, युवकांनी मंगळवारी रविनगर परिसरातील हनुमान मंदिराच्या आवारातील महादेवाला घंटा नाद जलाभिषेक केला आहे.