अमरावती- ग्रामपंचायतने चहा टपरीचे अतिक्रमण काढल्याने तरुणाने पाण्याच्या टाकीवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील दस्तगीर येथे सोमवारी घडली. शरद देवगिरीकर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
ग्रामपंचायतीने पान टपरी काढल्याने तरुणाचा पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न - ग्राम पंचायत
चहा टपरीचे अतिक्रमण काढल्याने तरुणाने पाण्याच्या टाकीवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील दस्तगीर येथे सोमवारी घडली.
शरदची गावातील मुख्य चौकात चहाची टपरी होती. यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र कोणतीही पूर्व सूचना न देता ग्रामपंचायतीने टपरीचे अतिक्रमण काढल्यामुळे शरदचा संसार उघड्यावर आला. त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्याची समजूत काढली. त्यानंतर तो आश्वासनानंतर खाली उतरला. ज्या ठिकाणी शरदची चहाची टपरी होती, त्याठिकाणी पाईपलाईन टाकल्यानंतर परत त्याच जागेवर त्याला टपरी टाकण्याची परवानगी ग्रामपंचायतने दिली. पोलिसांनी त्याला अटक करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यावेळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.