महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेट्रोलने स्वत:ला जाळून घेऊन युवकाची आत्महत्या; अमरावतीच्या शेंदोळा येथील घटना

मृतक सतीशला दारूचे व्यसन असल्याची माहिती असून तो आज सकाळपासून पेट्रोल ओतून मी आत्महत्या करणार असल्याचे नागरिकांना सांगत होता. मी रात्री ७ वाजता गावातील राष्ट्रीय महामार्गाखालील बोगद्याजवळ आत्महत्या करतो, असे तो गावातील नागरिकांना सांगत होता.

पेट्रोलने स्वत:ला जाळून घेऊन युवकाची आत्महत्या

By

Published : May 24, 2019, 10:19 PM IST

अमरावती - अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील आदर्श दत्तक गाव शेंदोळा खुर्द येथे एका 28 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. या युवकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटून घेतले. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवार सायंकाळी ७ वाजता घडली.

पेट्रोलने स्वत:ला जाळून घेऊन युवकाची आत्महत्या

सतीश नारायण सावरकर (वय २८ रा. शेंदोळा खुर्द) असे मृत युवकाचे नाव आहे. तो मोलमजुरी करत होता, गेल्या ६ महिन्यांपूर्वीच याच परिसरात एका तरुणानेही अशाच प्रकारे पेट्रोल ओतून आत्महत्या केली होती. या तरुणाचा आत्महत्येचा थरात कॅमेरात कैद झाला. मृतक सतीशला दारूचे व्यसन असल्याची माहिती असून तो आज सकाळपासून पेट्रोल ओतून मी आत्महत्या करणार असल्याचे नागरिकांना सांगत होता. मी रात्री ७ वाजता गावातील राष्ट्रीय महामार्गाखालील बोगद्याजवळ आत्महत्या करतो, असे तो गावातील नागरिकांना सांगत होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमीच मनोरुग्ण सारखा करायचा अखेर त्याने गावातील रोडवरील बोगद्याजवळ स्वतः च्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटून घेतले. या आगीत त्याचा जागीच कोळसा होऊन मृत्यू झाला.

यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. सहा महिन्यापूर्वी याच ठिकाणी प्रेमप्रकरनातून एका युवकाने पेट्रोल अंगावर घेऊन आत्महत्या केला होती. सहा महिन्यात पुन्हा ही सारखीच घटना घडली त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details