महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आठ-दहा पत्रं पाठवली; तरीही महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांची नियुक्ती नाही' - यशोमती ठाकूर महिला आयोग

अध्यक्ष नियुक्ती संदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना आतापर्यंत आठ ते दहा पत्रे दिली. मात्र, अद्यापही अध्यक्ष नेमला गेला नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. लवकर सर्व मंत्री एकत्र बसून महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्यात येईल असही मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Maharashtra State Commission for Women,
मंत्री यशोमती ठाकूर

By

Published : Oct 3, 2020, 1:36 PM IST


अमरावती- सध्या उत्तर प्रदेश मधील हाथरस बलात्कार प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितिच्या न्यायासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. मात्र राज्यात महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महिला आयोगाचे अध्यक्ष पद अध्यापही रिक्तच आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीचा मुहूर्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मागील आठ महिन्या पासून सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाहीतर अध्यक्ष नियुक्ती संदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना आतापर्यंत आठ ते दहा पत्रे दिली. मात्र, अद्यापही अध्यक्ष नेमला गेला नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. लवकर सर्व मंत्री एकत्र बसून महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्यात येईल असही मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

मंत्री यशोमती ठाकूर
महिलांवरील होणारे अत्याचार, महिलांच्या न्यायासाठी, महिलांच्या हक्कांसाठी महिला आयोग हे सातत्याने काम करत असते.मागील भाजप सरकार मध्ये विजया रहाटकर या राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. मात्र त्यांनी ४ फेब्रुवारी ला त्यांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मागील आठ महिन्यापासून राज्यातील महिला आयोगाला अध्यक्ष नसल्याचे समोर आले आहे.सध्या उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील घटनेवरून महाविकास आघाडी संतप्त झाली असताना मात्र या महाविकास आघाडीलाच महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्याचा मुहूर्त सापडला नाही.राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता राज्यात महिला आयोगाचा अध्यक्ष नेमावा यासाठी महाविकास आघाडी मधील राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना तबल आठ ते दहा वेळा पत्र लिहूनही महिला आयोगाचा अध्यक्ष नेमला नसल्याची माहिती खुद्द यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे महिला प्रश्नी आवाज उठवणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षच्या नेमणुकिवर एवढी दिरंगाई का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्यासाठी सर्वजन एकत्र येवून लवकरच अध्यक्ष स्थापण करू, अशी माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details