महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rukmini Mata Palkhi : रुक्मिणी मातेची पालखी अमरावतीत दाखल; आमदार यशोमती ठाकूर यांनी केले पूजन - Yashomati Thakur Welcomed Rukmini Mata Palkhi

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या विठ्ठल रुक्मिणी पालखीचे स्वागत करण्यात येत आहे. रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले जाते. ही पालखी आज अमरावतीत आल्यावर आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून बियाणी चौकात भव्य स्वागत करण्यात आले.

Rukmini Mata Palkhi
आमदार यशोमती ठाकूर यांनी केले पालखीचे पूजन

By

Published : May 26, 2023, 10:52 PM IST

अमरावती:रुक्मिणीचे माहेरघर असणाऱ्या कौंडण्यपूर येथून, आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या विठ्ठल रुक्मिणी संस्थांनची पालखी अमरावती शहरात दाखल झाली. बियाणी चौक येथे जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी या पालखीचे पूजन केले. यावेळी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषात पालखीचे स्वागत केले.

वारीवर पुष्पवृष्टी करण्यात आली: इसवी सन 1594 पासून कोंडण्यपूर येथून पंढरपूरला नियमित वारी जात आहे. या वारीत सहभागी वारकरी रोज तीस किलोमीटर पायी चालतात. आज अमरावती शहरात रुक्मिणी मातेच्या पालखीचे आगमन होताच, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चौकात या वारीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर बियाणी चौक येथे पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सहभागी वारकऱ्यांचे केले पूजन:आमदार यशोमती ठाकूर यांनी पालखीसह पालखीत सहभागी वारकऱ्यांचे पूजन केले. विभागीय आयुक्त निधी पांडे, प्रभारी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा, पोलीस आयुक्त रेड्डी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे यांच्यासह, माजी आमदार वीरेंद्र जगताप तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व अमरावतीकर भाविकांनी पालखीचे पूजन केले.



रिंगण सोहळ्याने सांगता: यावेळी बियाणी चौक येथे रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक महिला भाविकांनी यावेळी फुगडीचा फेर धरला. अनेक चिमुकल्या देखील या आनंदी सोहळ्यात सहभागी झाल्या. बियाणी चौकेतून ही वारी इर्विन चौक येथे पोहोचली असता, सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने या पालखीचे स्वागत करण्यात आले. शहरातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्वच धर्माच्या अनुयायांनी यावेळी पुष्पवर्षाव करून पालखीचे स्वागत केले. यावेळी अनेक मुस्लिम बांधव भगवा फेटा घालून या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते.



हेही वाचा -

  1. कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी निघाली पंढरपूरला अमरावतीकरांनी घेतले दर्शन
  2. Occasion of Ekadashi आमलकी एकादशी श्री विठ्ठलरुक्‍मिणी गाभाऱ्यात एक टन द्राक्षापासून द्राक्षांची आरास
  3. Pandharpur Vitthal Temple Donation पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी पावणे दोन कोटी रुपयांचे गुप्तदान

ABOUT THE AUTHOR

...view details