अमरावती -ट्वीट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधणाऱ्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अमरावती दौऱ्यावेळी यशोमती ठाकूर या उपस्थित होत्या. यावेळी ईटीव्ही भारतने त्यांना या बाबतीत विचारले असता, त्यांनी याचे उत्तर देणे टाळले.
यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया काय आहे प्रकरण?
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहावे, असे वाटत असेल, तर काँग्रेसच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करणे टाळा, असा सल्ला महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला होता. त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्य नाही, असे वक्तव्य पवार यांनी एका मुलाखतीत नुकतेच केले होते. त्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी ट्वीट करत पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.
यशोमती ठाकूर यांनी केलेले ट्विट हेही वाचा - सरकार शेतकऱ्यांचे ऐकणार का? आजच्या पाचव्या फेरीच्या बैठकीला सुरुवात