अमरावती- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज पार पडले. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना महिला व बाल विकास कल्याण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मेळघाटातील कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करणार - यशोमती ठाकूर
मेळघाटातील कुपोषण, आरोग्य आदी प्रश्न निकाली काढण्यासाठी योग्य ते काम करेन, असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
यशोमती ठाकूर
हेही वाचा - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वऱ्हाडी भाषेला मानाचे स्थान मिळवून देणार - श्याम ठक
मी 15 वर्षे सातत्याने मेळघाटमधील कुपोषण समस्या सभागृहात मांडत होती. आता मला अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे मी मेळघाटातील कुपोषण, आरोग्य आदी प्रश्न निकाली काढण्यासाठी योग्य ते काम करेन, असा विश्वास ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे.