अमरावती -राज्यभरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लावत 'ब्रेक द चेन'ची घोषणा करत राज्यभर कडक निर्बंध लागू केलेत. मात्र आज याला पहिल्याच दिवशी राज्यभर विरोध पाहायला मिळाला. अमरावती जिल्हातसुद्धा व्यापारी व कामगार रस्त्यावर उतरले होते व या लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यातच फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत १५ दिवसांचा लोकडाऊन अमरावतीमध्ये लावण्यात आला होता. त्यामुळे आता अमरावतीत लॉकडाऊनला शिथिलता द्यावी, अशी मागणी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत केली आहे.
'ब्रेक द चेन'ला शिथिलता देण्याची यशोमती ठाकूर यांची मागणी - amravati lockdown
अमरावतीत लॉकडाऊनला शिथिलता द्यावी, अशी मागणी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत केली आहे.
पुन्हा लॉकडाऊन लावल्याने संताप
अमरावती शहर आणि जिल्ह्यात आता कोरोना आटोक्यात येत आहे. अशात शासनाने घेतलेल्या बंदच्या निर्णयावर व्यापारी, कामगार बेचैन झाले असून, शहरातील सर्व दुकाने सुरू करावीत, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना निर्बंधाला उद्यापर्यंत शिथिलता मिळण्याची शक्यता यशोमती ठाकूर यांच्या पत्राने मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्हात कोरोनाची रुग्णसंख्याही नियंत्रणाबाहेर जात असल्याने फेब्रुवारी महिन्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन लावल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता अमरावतीत कोरोना रुग्णसंख्याही नियंत्रणात आहे. त्यामुळे अमरावतीत लॉकडाऊन नको, अशी मागणी सर्वसामान्य व व्यापारी यांची आहे. अमरावती जिल्हात फेब्रुवारी महिन्याची रुग्णसंख्या व आताची रुग्णसंख्या ही आकडेवारी यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदनातून मांडली होती.