नेत्रदानातून दूर होईल अंधांच्या आयुष्यातील अंधार - यशोमती ठाकूर - Amravati latest news
नेत्रदान, अवयवदान, देहदान हे सर्वात मोठे दान आहे. नेत्रदान हे असे एक दान आहे की, ज्याद्वारे अंध व्यक्तीच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांनाही रंगतदार जग पाहता येतं. असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
नेत्रदानातून दूर होईल अंधांच्या आयुष्यातील अंधार - यशोमती ठाकूर
अमरावती - नेत्रदान, अवयवदान, देहदान हे सर्वात मोठे दान आहे. नेत्रदान हे असे एक दान आहे की, ज्याद्वारे अंध व्यक्तीच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांनाही रंगतदार जग पाहता येतं. असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अमरावतीच्या हरिना नेत्रदान समितीच्यावतीने दरवर्षी नेत्रदान जनजागृती उपक्रम राबवण्यात येतो, यावर्षीही तो राबवण्यात आला आहे.