अमरावती - हरभरा काढणीचे काम करताना थ्रेशर मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैनपूर येथे सोमवारी घडली. सुधाकर मधुकर मोरे (वय 43) असे मृत मजुराचे नाव आहे.
थ्रेशर मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू - तांदुळ
भामोद शेत शिवारातील शेतात सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हरभरा काढणीचे काम सुरू होते. यादरम्यान थ्रेशर मशीनमध्ये अडकून सुधाकर मधुकर मोरे यांचा मृत्यू झाला.
थ्रेशर मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू
हेही वाचा - निर्भया प्रकरण : आरोपींची फाशी चौथ्यांदा पुढे ढकलली, दिल्लीतील न्यायालयाचा निर्णय..
भामोद शेत शिवारातील शेतात सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हरभरा काढणीचे काम सुरू होते. या दरम्यान थ्रेशरमध्ये अडकून मोरे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येवदा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक कट्यारमल करीत आहेत.