अमरावती -अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी मधील बबिताताई ताडे यांनी एक कोटी रुपये जिंकले. बबिताताई या एका विद्यालयात खिचडी शिजवण्याचे काम करतात. एक कोटी रुपये जिंकले असले तरी मी यापुढेही माझ्या विद्यार्थ्यांना खिचडी बनवून खाऊ घालेन, कारण ती माझी जबाबदारीच आहे, असे मत बबिताताई ताडे यांनी व्यक्त केलं आहे.
सरकारने पोषण आहार योजना 2002 मध्ये सुरू केली. तेव्हा आम्हाला केवळ दोनशे रुपये मिळत होते. त्यानंतर मुलांची पटसंख्या वाढल्याने आम्हाला एक हजार मिळू लागले. सध्या खिचडी शिजवण्याचे पंधराशे रुपये मिळतात.