अमरावती :अमरावती सायकलिंग असोसिएशनचे वतीने महिला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शरीर स्वास्थम खलूमहे या शब्दपंक्तीकडे लक्ष वेधीत मानव प्रजातीला आरोग्य अबाधित राखण्यासाठी या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. दैनंदिन जीवनात तत्पर, तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलिंग केल्यास ही बाब आरोग्य अबाधित राखण्यासाठी मोलाची ठरू पाहत असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी येथे केले. यासोबतच पर्यावरणाचा समतोल यथावत कायम राखण्यासाठी तसेच शारीरिक क्षमता, तंदुरुस्ती वृद्धिंगत होण्यासाठी नियमितपणे सायकलिंग करणे आवश्यक आहे. असा बहुमूल्य संदेश या सायकल रॅलीच्या निमित्ताने सर्व सायकलपटूंनी यावेळी शहरवासीयांना दिल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
सायकलिंग असोसिएशनचे आयोजन :यावेळी महिला सायकलपटूंना टी-शर्ट चे वितरण करण्यात आले. तदपूर्वी आमदार सुलभाताई खोडके यांनी सर्व सायकलपटूसोबत हितगुज करीत संवाद साधला. तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अमरावती सायकलिंग असोसिएशनचे वतीने आयोजित सायकल रॅली हा उपक्रम अभिनव-अनुकरणीय व प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी यावेळी उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.