महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोर्शीतील महिला बांगड्या विकायला गेली अन् कोरोना घेऊन आली

जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रोहनखेडा या गावातील एका महिलेला लग्न समारंभात कोरोनाची लागण झाली होती. त्याच लग्न समारंभात विचोरी या गावातील ही महिला देखील बांगड्या भरायला गेली होती. आज आलेल्या अहवालात या महिलेला लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

woman-tested-positive-for-corona-in-mosrhi-tahsil-of-amravati
अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील बांगड्या विकणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण

By

Published : Jun 25, 2020, 4:08 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ४६२ वर पोहोचली आहे. आज आलेल्या अहवालात मोर्शी तालुक्यातील विचोरी गावातील बांगड्या विकणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गावात ग्रामपंचायतच्यावतीने सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या पाच पथकांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. दरम्यान, आता मोर्शी तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन झाली आहे. यापैकी पहिल्या बाधित महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील बांगड्या विकणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण

जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रोहनखेडा या गावातील एका महिलेला लग्न समारंभात कोरोनाची लागण झाली होती. त्याच लग्न समारंभात विचोरी या गावातील ही महिला देखील बांगड्या भरायला गेली होती. तेथून काही दिवसांनी रोहनखेड येथील महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर तिच्या संपर्कातील ४७ जणांना १८ तारखेला मोर्शी येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. दरम्यान, त्यातील ८ लोकांचे घशाचे नमुने २० तारखेला तपासणी नेले होते. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यात ही बांगड्या विकणारी महिलादेखील कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले, तर ७ लोकांचे संशयितांचे अहवाल निगेटिव्ह असून एक अहवाल प्रलंबित आहे.

दरम्यान, ही महिला गेल्या काही दिवसांत किती लोकांच्या संपर्कात आली आहे, याची माहिती ही प्रशासनाकडून घेतली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details