महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटातील ई-वन वाघिणीचा महिलेवर हल्ला

मागील काही दिवसांपूर्वीच चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रमधून ही वाघीण मेळघाटात दाखल झाली आहे. आधी एका मुलीवर नंतर एका म्हशींवर आणि आता या महिलेवर हल्ला केल्याने या वाघिणीबद्दल कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

मेळघाट

By

Published : Jul 13, 2019, 11:59 PM IST

अमरावती- मेळघाटमधील धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कंजोली गावातील एका आदिवासी शेतकरी महिलेवर या ई-वन वाघिणीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघड झाली. मीराबाई रामेश्वर कासदेकर असे जखमी महिलेचे नाव आहे. कंजोली, राणीगाव, धूळघाट रेल्वे या परिसरातील नागरिकांमध्ये ई-वन वाघिणीच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मेळघाट

रामेश्वर कासदेकर व त्यांची पत्नी मीराबाई कासदेकर हे आदिवासी कुटुंब गावाशेजारी असलेल्या आपल्या शेतातील पिकाच्या रखवालीकरता रात्री शेतात गेले होते. मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांना पिकात रानडुक्कर आल्याचा अंदाज त्यांना आला. दरम्यान ते पिकानजीक आले. मात्र, रानडुकराऐवजी त्यांचा सामना ई-वन वाघिणीशी झाला. ती वाघीण मीराबाई कासदेकर यांच्या अंगावर धावून गेली. तिचा पंजा हातावर पडल्याचे व्रण उमटले.

पती-पत्नीने आरडाओरड करून वाघिणीला पळविण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून नागरिकांनीही शेताकडे धाव घेतली. ई-वन वाघिणीने तेथून पळ काढला. कंजोली येथील नागरिकांनी धूळघाट रेल्वे परिक्षेत्रातील वनकर्मचा-यांना माहिती दिली असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी मीराबाईला धूळघाट रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणले.

ABOUT THE AUTHOR

...view details