महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीत दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस स्टेशनला घेराव

By

Published : Feb 11, 2020, 11:35 PM IST

मंगरूळ चव्हाळा येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात आमरण उपोषण करण्यात आले. मात्र, यानंतरही अवैध दारूविक्री सुरुच असल्याने शेकडो महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला.

woman agitates against illegal liquor selling
अमरावतीत दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस स्टेशनला घेराव

अमरावती -मंगरूळ चव्हाळा येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात आमरण उपोषण करण्यात आले. मात्र, यानंतरही अवैध दारूविक्री सुरुच असल्याने शेकडो महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला.

अमरावतीत दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस स्टेशनला घेराव

मंगरुळ चव्हाळा गावात गेल्या अनेक वर्षांपासून मोठया प्रमाणात दारू विक्री होत आहे. यामुळे कौटुंबिक कलह होत असून गावांमधील शांतता भंग पावल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले. यामुळेच गावातील अवैध दारू विक्री बंद होण्यासाठी गावातील महिलांनी लढा उभारला आहे.

26 जानेवारीला निवेदन देऊन या महिलांनी पोलीस निरीक्षकांकडे दारू बंदीची मागणी केली. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने महिलांनी चार दिवस बेमुदत उपोषण केले. यानंतर संतप्त महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला.

जो पर्यंत दारुबंदी होणार नाही; तो पर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details