अमरावती -मेळघाटात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ( Melghat Water Crisis ) अतिशय गंभीर होत आहे. चिखलदाऱ्यातील रहिवाशांना सुद्धा पाणी टंचाईची ( Water Scarcity In Melghat ) झळ सोसावी लागत आहे. लगतच्या अनेक गावांमधील आदिवासी महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असताना कोणताही लोकप्रतिनीधी ( Public Representative Ignore Melghat Water Issue ) या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही. गंभीर बाब म्हणजे येथील नागरिकांना गढूळ पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे. मेळघाटात पिण्याच्या पाण्याची इतकी भीषण परिस्थिती असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) मात्र हनुमान चालिसा म्हणण्यात ( Hanuman Chalisa Controversy ) व्यस्त आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना मेळघाट फक्त निवडणुकीलाच आठवतो का? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
चिमुकल्या, तरुणी, वृद्ध महिला सर्वच विहिरीवर -चिखलदरा आणि लगतच्या परिसरातील तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. या ठिकाणी परतवाडा येथून टँकरद्वारे पाणी आणण्याची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने केली आहे. चिखलदरासह लगतच्या चार ते पाच गावांमध्ये टँकर येतो. एकूण 11 टँकर पैकी तीन ते चार टँकर हे लगेच या गावातील विहिरीमध्ये पाणी टाकतात. टँकरचे पाणी विहिरीत सोडल्या बरोबरच गावातील चिमुकल्या मुली, तरुणी, वृद्ध महिला सर्वच दोर बकेट आणि गुंड घेऊन विहिरीवर गर्दी करतात. कधी सकाळच्या वेळेस टँकरने विहिरीत पाणी सोडले तेव्हा सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत विहिरीवर गर्दी पाहायला मिळते. तर कधी दुपारी 4 वाजता टँकर आला की सायंकाळी 7 वाजेपर्यंत गाव ते विहीर अशी पाण्यासाठी महिलांची जत्रा पाहायला मिळते. पाण्यासाठी सर्व त्रास महिलांना सहन करावा लागतो. पुरुष मंडळी विहिरीपर्यंत येत नाही, असे दुःखही अनेक महिलांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले. एका महिलेच्या डोक्यावर तीन ते चार पाण्याचे हंडे वाहून नेताना चे चित्र चिखलदरा सहल लगतच्या मोठा गावातही पहायला मिळते आहे.