अमरावती - वरुड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सध्या जोरदार चर्चा सुरू असताना गुरुवारी पहाटे पोलिसांनी दोन मोठ्या कारवाई केली. भंडारा येथे अवैधरित्या तांदुळाचे 208 पोते घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला असुन 3 रेतीचे ट्रकही पकडल्याची कारवाई वरुड पोलिसांनी केली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
वरुडमध्ये २०८ पोते भरलेला तांदुळाचा ट्रक जप्त - वरुड पोलिस न्यूज
जिल्ह्यात अवैध व्यवसायाला बंदी आहे. तरीही छुप्या मार्गाने सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. या अतंर्गत गुरुवारी पोलिसांनी 2 ठिकाणी कारवाई केली.हिल्या कारवाईत 1 कोटी दहा लाख रुपयांचे 3 रेतीचे ट्रक पोलिसांनी पकडले.तर, दुसऱ्या कारवाईत मोर्शीवरून भंडारा येथे जाणारा 208 पोते तांदुळ भरलेला ट्रक जप्त केला.
हेही वाचा -'कर्ज काढायची वेळ आलीय.. त्यामुळे पगाराला कात्री लावण्याची गरज'
जिल्ह्यात अवैध व्यवसायाला बंदी आहे. तरीही छुप्या मार्गाने सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. या अतंर्गत गुरुवारी पोलिसांनी 2 ठिकाणी कारवाई केली.पहिल्या कारवाईत 1 कोटी दहा लाख रुपयांचे 3 रेतीचे ट्रक पोलिसांनी पकडले.तर, दुसऱ्या कारवाईत मोर्शीवरून भंडारा येथे जाणारा 208 पोते तांदुळ भरलेला ट्रक जप्त केला. सदर गाडी क्रमांक एम. एच. 27 BX 2179 मध्ये आढळलेला हा माल सरकारी आहे की खाजगी याबाबत पुरवठा निरीक्षक प्रमोद दुधे, तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहे. याबाबत, सविस्तर चौकशी पोलिस निरीक्षक मगन मेहते करत आहे.