अमरावती :संत गाडगेबाबाअमरावती विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार (Sant Gadgebaba Amravati University Senate Election) आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून ही आठवी सिनेटची निवडणूक होत आहे. विद्यापीठावर अधिराज्य गाजवणाऱ्या नागपूर विद्यापीठ टीचर्स असोसिएशन अर्थात नुटा विरोधात या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि जस्टीस पॅनल टक्कर देण्यासाठी सज्ज झाले (Election held on November 20) आहेत.
विद्यापीठातील राजकारण :संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना 1983 मध्ये झाली त्यानंतर सिनेटची पहिली निवडणूक 1989 मध्ये घेण्यात आली. पहिल्या निवडणुकीपासून नुटा ही संघटना विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय आहे. प्राध्यापक बीटी देशमुख यांच्या नेतृत्वात या संघटनेचे वर्चस्व कायम अमरावती विद्यापीठावर राहिले आहे. नुटाच्या विरोधात सुक्टा अर्थात संत गाडगेबाबा अमरावती अमरावती युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने पहिल्यांदा 2005 मध्ये झालेल्या निवडणुकीत पॅनल घोषित केले होते. सुक्टाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर संतोष ठाकरे हे स्वतः 2002 मध्ये झालेल्या सिनेट निवडणुकीत नुटाचे दिग्गज उमेदवार प्राध्यापक प.सी काणे यांना पराभूत करून निवडून आले होते. त्यानंतर डॉक्टर संतोष ठाकरे यांनी 2005 मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ टीचर्स असोसिएशन ही नवी संघटना स्थापन केली. 2005 आणि 2010 या दोन्ही निवडणुकीत नुटा आणि सुक्टा एकमेकांविरोधात होत्या. 2017 च्या निवडणुकीत मात्र सुक्टा मधील अनेक सदस्य हे प्राचार्य झाले आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्राचार्य फोरम या नव्या संघटनेची स्थापना झाल्यामुळे सुक्टामधील अनेक सदस्य नुटामध्ये गेले तर प्राचार्य फोरम ही संथटना विद्यापीठाच्या राजकारणात नव्याने समोर आलेल्या शिक्षण मंचला रोखण्यासाठी नुटा सोबत होती. 2017 ची निवडणूक ही विद्यापीठाच्या नव्या कायद्यानुसार झाली होती. या निवडणुकीत नुटाचे 37 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. राज्यपाल आणि कुलगुरू नामीत सदस्यांमध्ये सर्व शिक्षण मंचाचे सदस्य सभागृहात आले (Sant Gadgebaba Amravati University) होते.
सदस्य संख्या :संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची संख्या एकूण 70 इतकी आहे. यापैकी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधून दोन आमदार दोन नगरसेवक दोन शिक्षकेतर कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती ही थेट राज्यपालांकडून केली जाते. यासह समाजातील विविध क्षेत्रातील एकूण दहा जणांची नियुक्ती ही कुलगुरूंद्वारे करण्यात येते. यासह विद्यापीठातील 10 अधिकाऱ्यांची नियुक्ती नियमानुसार होते. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून प्रत्येकी 10 हे निवडणुकीद्वारे सभागृहात निवडून जातात. शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले शिक्षक आणि प्राचार्यांपैकी आठ जणांची निवडणुकीद्वारे निवड सभागृहातील शिक्षकांत द्वारे व्यवस्थापन परिषदेसाठी केली (Senate Election held on November 20) जाते.
नुटा पुन्हा सज्ज :नुटाने यावेळी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात निवडणूक लढवीत आहेत. व्यवस्थापन परिषदेत देखील नोटाचे समर्थक प्रतिनिधी लढत देत आहेत. आतापर्यंत उमेदवारांच्या अर्जांची जी छाननी झाली त्यामध्ये नुटाचे दोन उमेदवार अविरोध निवडून आले असल्याची माहिती नुटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना दिली. 2017 च्या निवडणुकीत नोटाला 70 टक्के यश मिळाले होते या निवडणुकीत नोटा पूर्ण ताकदीने उतरली असून राज्य आणि केंद्र स्तरावर शिक्षकांच्या संबंधित मागण्यासाठी आघाडीवर असणाऱ्या आमच्या नुटा संघटनेला या निवडणुकीत भरगोस यश प्राप्त होईल असा विश्वास देखील प्राध्यापक डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी व्यक्त केला.