अमरावती- जिल्ह्यातील नांदगाव खंडेशवर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई गावाच्या तलाठ्याने व त्याच्या काही मित्रांनी तलाठी कार्यलयात एका महिलेला आणून अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार गावकऱ्यांनी तलाठ्याला व महिलेला रंगेहाथ पकडून समोर आणला आहे. त्यामुळे तलाठी कार्यालय नागरिकांच्या कामांसाठी आहे की अश्लिल चाळे करण्याचा अड्डा आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैणाई या गावातील तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या व्ही.जी. भगत या तलाठ्याने बुधवारी (दि. 24) तलाठी कार्यालयात एका महिलेला आणून व सोबतच त्याच्या पाच मित्रांना बोलावून कार्यालयात दारू पिऊन अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. तलाठी कार्यालयात अश्लिल चाळे सुरू असल्याची कुजबूज गावातील नागरिकांना लागतात पाच ते सहा नागरिकांनी तलाठी कार्यालय गाठले. या कार्यालयात त सुरू असलेला प्रकार पाहून संतप्त गावकऱ्यांनी तलाठ्याला व त्याच्या सहकाऱ्याला चोप दिला. यामध्ये त्याचे तीन मित्र हे पळून गेले. दरम्यान, तलाठी कार्यालयात असा प्रकार नेहमीच होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
प्रतिबंधक कारवाई केली