अमरावती - जिल्ह्यात मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शेकडो हेक्टरवरील भाजीपाला पावसामुळे खराब झाल्याने बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे लोकांच्या रोजच्या जेवणातल्या भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांसह नोकरदार वर्गाच्या खिशाला कात्री बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या भाज्यांचे दर दुप्पट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान; बाजारपेठेत आवक घटली, भावही वधारले
जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे उन्हाळ्यात हजारो शेतकऱ्यांना भाजीपाला फेकून द्यावा लागला होता. दरम्यान, आता शेतकऱ्यांनी कसे-बसे सावरत पुन्हा भाजीपाल्याची लागवड केली. मात्र, मागील दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. बाजारपेठत भाजीपाल्याचे दर दुप्पट झाले असले तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
सततच्या पावसामुळे भाजीपाल्याने नुकसान
भाजीपाल्याचे दर (ठोक आणि चिल्लर) -
बटाटे -30-40 रु
वांगे- 35-60 रु
पालक- 120-150 रु
मिरची- 60-80 रु
टमाटर- 50-60 रु
गोबी- 35-50 रु
कोथिंबीर- 200-260 रु
गाजर- 60-120 रु
काकडी- 40-60 रु
भेंडी- 20-40 रु
शेंगा-30-50 रु
कारले- 30-50 रु
दोडकी- 40-60 रु
लवकी- 60-80 रु
कवडे- 25-30 रु
मेथी- 200-240 रु
Last Updated : Aug 27, 2020, 2:12 PM IST