महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणीदार महाराष्ट्र ही सरकारने केलेली फसवणूक - वसंत पुरके

काँग्रेसने नियुक्त केलेल्या दुष्काळ पाहणी समितीने आज अमरावती जिल्ह्यातील चंदूर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या आमला विश्वेश्वर या दुष्काळी गावाला भेट दिली. यावेळी सरकारवर टीका करणे हा आमचा मुळीच हेतू नाही. वास्तवात मुख्यमंत्र्यांनी पाणीदार महाराष्ट्र्र करू, असे स्वप्न दाखविले. परंतु हे स्वप्न जनतेची फसवणूक ठरली, असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत पुरके यांनी केला आहे.

पाणीदार महाराष्ट्र ही सरकारने केलेली फसवणूक असल्याचे वसंत फुरके यांनी म्हटले

By

Published : May 16, 2019, 2:41 PM IST

अमरावती - सरकारवर टीका करणे हा आमचा मुळीच हेतू नाही. वास्तवात मुख्यमंत्र्यांनी पाणीदार महाराष्ट्र्र करू, असे स्वप्न दाखविले. परंतु हे स्वप्न जनतेची फसवणूक ठरली, असा आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते वसंत पुरके यांनी केला आहे.

पाणीदार महाराष्ट्र ही सरकारने केलेली फसवणूक असल्याचे वसंत फुरके यांनी म्हटले

काँग्रेसने नियुक्त केलेल्या दुष्काळ पाहणी समितीने आज अमरावती जिल्ह्यातील चंदूर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या आमला विश्वेश्वर या दुष्काळी गावाला भेट दिली. वसंत पुरके, आमदार राहुल बोंद्रे, आमदार वीरेंद्र जगताप, अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडणे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी आमला विश्वेशवर येथील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. तसेच त्यांनी गावातील विहिरी, शेत शिवारांची पाहणी केली.

पुरके म्हणाले, सरकारचे टँकरमुक्त गावाची घोषणा फोल ठरली आहे. आज अनेक गावांना पाण्याच्या टँकरची गरज आहे. मात्र, टँकरसाठी प्रस्ताव पाठवून दोन महिने उलटल्यावरही गावात टँकर येत नाही, अशी परिस्थिती आहे. पाणी पूरक योजनेतूनही या गावाला पाणी मिळाले नाही.

या गावातील विहिरी आणखी १० फूट खोदल्या तर त्यांना पाणी लागू शकते. मात्र, हे कामसुद्धा सरकारने केले नाही. सरकारने पाण्यासारख्या विषयात जनतेची फसवणूक करू नये, असेही पुरके म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details