सोलापूर (पंढरपूर) -उजनी जलाशयाच्या विस्तारित परिसरामध्ये स्थलांतरित पक्ष्यांची रेलचेल सुरू झाली आहे. परदेशाहून हजारो किलोमीटरचा प्रवास करून, उजनी जलाशयाच्या परिसरात स्थलांतर झाले आहेत. ( Ujani Lake Exotic Birds ) गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे आकर्षण ठरणाऱ्या रोहित उर्फ फ्लेमिंगो आता पट्टकदब हंसाचेही आगमन झाले आहे. हिवाळ्याच्या एक महिन्या आधीच स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. पक्षी प्रेमींसाठी सध्या ही पर्वणी ठरत आहे.
उजनी जलाशयाच्या काठावरील हिरवळीवर बागडत आहेत
हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या नितळ पाण्यात नक्षीदार असे पट्टकदब हंसा उजनीच्या जलाशयांमध्ये येऊन दाखल झाले आहेत. उजनी जलाशयाच्या काठावरील हिरवळीवर हे नजाकतदार हंस दिमाखदार चालीने वावरताना पक्षीप्रेमींना आकर्षण ठरत आहेत. ( Exotic birds ) पांढरी शुभ्र डोके, त्यावर दोन काळे समांतर पट्टी ही या हंसाना ओळखण्याच्या खुणा आहेत. ( Migratory birds Ujani Lake 2021 ) स्थानिक बदकांपेक्षा मोठ्या आकाराचे शरीर असलेले या हंसातील चोच गुलाबी आहे व त्यांचे पाय नारंगी पिवळे पाय असतात. राखी रंगाच्या पंखावर काळे पट्टे असतात. शेपटीचे मूळ व टोक पांढरे शुभ्र असतात. यांना कादंबहंस या नावानेही ओळखतात. यांना पाहण्यासाठी पर्यटकांची उजनीच्या जलाशयात गर्दी होत आहे.
भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्र मन मोहून टाकतो