अमरावती -वरूड-नागपूर महामार्गावरील कुरळी येथील पेट्रोल पंपासमोर पहाटे भीषण अपघात झाला. अंजनगाव सुर्जी येथून नागपूरकडे धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच २८ एपी ७८०५ चा चालकाचा त्याच्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून तो शौचविधी करण्यासाठी गेला. यावेळी मागून केळीचे कॅरेट भरून नागपूरकडे जाणाऱ्या आयसर क्रमांक एम एच २७ बी एक्स ३३०६ ने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रक क्लिनरचा जागीच मृत्यु झाले आहे.
अमरावतीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक; एकाचा जागीच मृत्यू - दोन ट्रकचा अपघात
नागपूर मार्गावरील अजंता सर्वो पेट्रोल पंपासमोर अंजनगाव सुर्जीकडून धान्याचे घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक २८ एपी ७८०५ हा नागपूर मार्गावरील कुरळी येथील पेट्रोल पंपाजवळ आला. त्याने सौच्छविधीला जाण्यासाठी त्याच्या ताब्यातील मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून तो सौच्छविधीसाठी गेला. दरम्यान नागपूरकडे केळीचे कॅरेट घेवून जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच २७ बी एक्सच्या चालकाचे नियंत्रन सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.
प्राप्त माहितीनुसार पहाटे नागपूर मार्गावरील अजंता सर्वो पेट्रोल पंपासमोर अंजनगाव सुर्जीकडून धान्याचे घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक २८ एपी ७८०५ हा नागपूर मार्गावरील कुरळी येथील पेट्रोल पंपाजवळ आला. त्याने सौच्छविधीला जाण्यासाठी त्याच्या ताब्यातील मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून तो सौच्छविधीसाठी गेला. दरम्यान नागपूरकडे केळीचे कॅरेट घेवून जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच २७ बी एक्सच्या चालकाचे नियंत्रन सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. मुकेश दिनेश करुले (वय ३६, रा. टाकरखेडा) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -मोक्का कोर्टाचे आदेश आल्यानंतरच एनसीबीला मिळणार इकबाल कासकरचा ताबा