धामणगाव रेल्वे (अमरावती) - जिल्ह्यातील धामणागाव रेल्वे तालुक्यात रविवारी एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना घडल्या. 24 वर्षीय तरुण आणि 40 वर्षीय व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. दोघांचेही शवविच्छेदन धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
धामणगाव तालुक्यात रविवारी दोन आत्महत्या; देवगाव व झाडा येथील घटना - talegaon police
जिल्ह्यातील धामणागाव रेल्वे तालुक्यात रविवारी एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना घडल्या. 24 वर्षीय तरुण आणि 40 वर्षीय व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. दोघांचेही शवविच्छेदन धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
पहिली घटना झाडा येथे दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली. शुभम संतोष ठाकरे (वय 24) असे आत्महत्याग्रस्त तरुणाचे नाव आहे. शुभमने विष पिवून जीवन संपवले. तर दुसरी घटना देवगाव येथील वार्ड क्र. 3 मध्ये घडली. हरीश शिवराज चौधरी (वय 40) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मंगरूळ दस्तगीर आणि तळेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा अधिक तपास मंगरूळ दस्तगीर आणि तळेगाव पोलीस करित आहेत.