महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या भूलेश्वरी धरणात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू - भूलेश्वरी धरण अमरावती

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात भूलेश्वरी धरणात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. धरणात पाण्यात उतरुन आंघोळ करत असताना पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने दोघींचा मृत्यू झाला.

bhuleshwari dam in amravati
अमरावतीच्या भूलेश्वरी धरणात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

By

Published : Jun 13, 2020, 7:14 PM IST

अमरावती - जिल्ह्यात भुलेश्वरी धरणात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. ही घटना अचलपूर तालुक्यातील पथ्रोट नजीकच्या गोंडवाघोली गावात घडली. रश्मिता राजेश बेलसरे (१०) व कावेरी राजेश बेलसरे (८वर्ष) अशी मृत मुलींची नावे आहेत.

अचलपूर तालुक्यातील कुणबी वाघोली येथील रश्मिता आणि कावेरी या दोघी सख्या बहीणी आणि त्यांच्या दोन मावस बहीणी घराजवळ खेळत होत्या. खेळता खेळता दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान त्या भुलेश्वरी धरणावर पोहचल्या. धरणात पाण्यात उतरुन आंघोळ करत असताना पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने दोघी बहिणींचा मृत्यू झाला. तर दोन मावस बहिणी बचावल्या. पोलिसांनी दोन्ही मृतदेह धरणातून काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details