अमरावती :जिल्ह्यातील परतवाडा येथील रहिवासी रमेश तायडे यांच्या गालात गत वीस वर्षांपासून गाठ होती. ही गाठ दुखायची नाही मात्र गाल फुगलेला दिसत असल्यामुळे हे विद्रूप वाटायचे. गत पाच सहा वर्षात अनेक डॉक्टरांना ही गाठ दाखवली. काही डॉक्टरांनी ही गाठ काढण्यासाठी चार-पाच शस्त्रक्रिया कराव्या लागतील असे सांगितले. इतक्या शस्त्रक्रिया करायच्या म्हणून भीतीच वाटली मात्र अमरावती शहरातील डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर नीरज मुर्के यांनी एकदाच शस्त्रक्रिया करून ही गाठ सहज काढता येते असा धीर दिल्यावर मी या ठिकाणी शस्त्रक्रिया करून घेतली अशी माहिती राजेंद्र तायडे यांनी ई 'टीव्ही भारत' शी बोलताना दिली.
दोन तास चालली शस्त्रक्रिया :डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील का नाक घसा विभागात खास शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गालावर गाठ असणारे रमेश तायडे हे रुग्ण आले होते. डॉ. नीरज मुरके यांनी त्यांच्या गालाची सखोल तपासणी केल्यावर लाळीमध्ये असणारी गाठ जी. 'प्लेओमोर्फीक अडेनोमा' असल्याचे लक्षात आले. हा अतिशय दुर्धर रोग आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी संमती दिल्यावर आम्ही शस्त्रक्रिया केल्याचे डॉक्टर नीरज मुरके 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. सलग दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत 10 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर एवढ्या आकाराची आणि सुमारे एक पाव वजनाची गाठ रुग्णाच्या गालातून बाहेर काढण्यात आली.