अमरावती- सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रा. स्वप्नील पोतदार यांच्या गाणू लेआऊट परिसरातील बंद घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोर घरात असतानाच पोतदार कुटुंब बाहेर गावावरून परत आल्याने दरोडेखोरांनी पोतदार कुटुंबीयांना शस्त्रांचा धाक दाखवत झटापट करून घरामागे उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओ कारमध्ये बसून पळ काढला.
गाणू लेआऊट परिसरात प्रा. स्वप्नील पोतदार यांच्या घरात दरोड्याचा प्रयत्न - दरोडेखोर
अमरावती सारख्या शहरात रात्री ८ वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याची घटना होत असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. यातील दोन दरोडेखोर हे २३ ते २५ वर्ष तसेच दोघे ३० ते ३५ वर्ष वयोगटातील होते असे प्रा. स्वप्नील पोतदार यांनी 'ईटीव्ही भारत' ला सांगितले.
बुधवारी सकाळी प्रा. स्वप्नील पोतदार हे आई, वडील, पत्नी आणि मुलींसह गावी गेले होते. राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जुन्या महामार्गावर असणाऱ्या गणू लेआऊट परिसरातील त्यांच्या बंद घराच्या दराचे कुलूप तोडून दरोडेखोर रात्री ८ वाजेच्या सुमारास घरात शिरले. दरोडेखोरांनी घरातील आलमारी फोडली. आलमारीतील लॉकरचे दार दरोडेखोरांना उघडता आले नाही. दरम्यान, सव्वाआठ वाजेच्या सुमारास पोतदार कुटुंब घरी आले असता. अंगणाच्या गेटला कुलूप असताना घरातील लाईट चालू असल्याने पोतदार यांना संशय आला. गेट उघडून पोतदार समोर येताच त्यांना घराच्या दारात दोन तरुण उभे दिसले. यावेळी दोन्ही तरुणांनी पोतदार यांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून आले. यावेळी पोतदार यांच्या आईला धक्का लागताच त्या खाली पडल्या. यावेळी दरोडेखोरांनी पिस्तूल काढून पोतदार कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रयत्न करत बाहेर उभ्या असणाऱ्या दोन दरोडेखोरांसह घरात असणाऱ्या दोन आशा चौघांनी घराच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून घरामागे उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओत बसून बडनेरच्या दिशेने पळ काढला.
अमरावती सारख्या शहरात रात्री ८ वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याची घटना होत असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. यातील दोन दरोडेखोर हे २३ ते २५ वर्ष तसेच दोघे ३० ते ३५ वर्ष वयोगटातील होते असे प्रा. स्वप्नील पोतदार यांनी 'ईटीव्ही भारत' ला सांगितले. दरोडेखोर घरात शिरतानाचे फूटेज सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट आले आहेत. राजपेठ पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.