अमरावती- मोहाची फुले वेचायला गेलेल्या आदिवासी वृद्धावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना धारणी तालुक्यातील बोथरा गावाच्या परिसरातील जंगलात घडली.
मेळघाटातील आदिवासी वृद्धावर अस्वलाचा जीवघेणा हल्ला - Melghat
गुटू बेठे असे जखमी झालेल्या आदिवासी वृद्धाचे नाव आहे. धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मेळघाटातील आदिवासी वृद्धावर अस्वलाचा जीवघेणा हल्ला
गुटू बेठे असे जखमी झालेल्या आदिवासी वृद्धाचे नाव आहे. धारणी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
बेठे हे नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मोहाची फुले वेचण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान जंगलात फिरणाऱ्या एका अस्वलाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.