महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीमध्ये टँकरची रिक्षाला धडक, रिक्षाचालक गंभीर - in amravati

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील जुन्या महामार्गावर बैल बाजार परिसरात पेट्रोलच्या टँकरने रिक्षाला धडक देऊन अपघात झाला आहे. या अपघातात ऑटोरिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल (शुक्रवारी) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला.

टँकरची रिक्षाला धडक, रिक्षाचालक गंभीर

By

Published : Aug 17, 2019, 5:38 AM IST

Updated : Aug 17, 2019, 7:26 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील बडनेरा येथील जुन्या महामार्गावर बैल बाजार परिसरात पेट्रोलच्या टँकरने रिक्षाला धडक देऊन अपघात झाला आहे. या अपघातात ऑटोरिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल (शुक्रवारी) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला.

टँकरची रिक्षाला धडक, रिक्षाचालक गंभीर

रात्री दहा वाजेच्या सुमारास जुन्या महामार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरने समोर असणाऱ्या ऑटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच बडनेरा पोलीस घटनास्थळी पोहचले. यावेळी टँकरचा चालक दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी टँकरच्या चालक आणि क्लीनरला अटक केली तर जखमी ऑटो रिक्षाचालकास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी उसळली होती.

Last Updated : Aug 17, 2019, 7:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details