महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 22, 2020, 12:18 PM IST

ETV Bharat / state

वनविभाग अन् नगरपरिषदेमध्ये समन्वयाचा अभाव, चिखलदऱ्यातील पर्यटक आल्या पावली परतले

कोरोनाच्या भीतीपोटी चिखलदरा नगर परिषदेने पर्यटकांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे पर्यटकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. तसेच जिप्सी व्यावसायिकांना देखील याचा फटका बसला आहे. वनविभागाने जंगल सफारीला परवानगी दिली. त्यावेळी चिखलदरा नगर परिषदेसोबत समन्वय साधला नाही का? असा सवाल जिप्सी व्यावसायिक आणि पर्यटक उपस्थित करत आहेत.

chikhaldara tourist place  chikhaldara latest news  forest department chikhaldara  tourist issue in chikhaldara  चिखलदरा लेटेस्ट न्यूज  चिखलदरा वनविभाग  चिखलदरा पर्यटन स्थळ  पर्यटनावर कोरोनाचा प्रभाव  corona effect on tourism
वनविभाग अन् नगरपरिषदेमध्ये समन्वयाचा अभाव

अमरावती -मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर्यंटकांसाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू झाला असून फक्त जंगल सफारीला परवानगी देण्यात आली आहे. वनविभागाकडून पर्यटकांना परवानगी दिली आहे. मात्र, या पर्यटकांना चिखलदऱ्यात प्रवेश करण्यास नगरपरिषेदेने बंदी घातली. त्यामुळे पर्यटकांना आल्या पावली परतावे लागले. परिणामी या प्रकरणी पर्यटकांनी संताप व्यक्त केला.

वनविभाग अन् नगरपरिषदेमध्ये समन्वयाचा अभाव, चिखलदऱ्यातील पर्यटक आल्या पावली परतले

देशात कोरोनाने थैमान घातल्यामुळे लॉकडाऊन लागू केले होते. मात्र, आता लॉकडाऊनचे नियम बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले. त्यामुळे वनविभागाकडून मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. तसेच पावसाळ्यात पर्यटकांची चिखलदऱ्यामध्ये प्रचंड गर्दी असते. पण, पर्यटनासाठी परवानगी नसून फक्त जंगल सफारीला ही परवानगी दिली. त्यामुळे जंगल सफारीसाठी पर्यटक दूरवरून येत आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी चिखलदरा नगर परिषदेने पर्यटकांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे पर्यटकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. तसेच जिप्सी व्यावसायिकांना देखील याचा फटका बसला आहे. वनविभागाने जंगल सफारीला परवानगी दिली. त्यावेळी चिखलदरा नगर परिषदेसोबत समन्वय साधला नाही का? असा सवाल जिप्सी व्यावसायिक आणि पर्यटक उपस्थित करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details