अमरावती -जिल्ह्यात मेळघाट आणि चिखलदऱ्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रचंड धुके निर्माण झाले आहे. त्यामध्येच शनिवार आणि रविवार दोन सुट्टीचे दिवस असल्याने पर्यटकांनी याठिकाणी गर्दी केली होती.
विदर्भाचे नंदनवन हरवले धुक्यात; चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची गर्दी - chikhaldara hill station
चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. यालाच विदर्भाचे नंदनवन देखील म्हटले जाते. शनिवार, रविवार दोन दिवस सुट्ट्या असल्याने पर्यटकांनी याठिकाणी गर्दी केली होती.
विदर्भाचे नंदनवन धुक्यात हरवले, चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची गर्दी
चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. यालाच विदर्भाचे नंदनवन देखील म्हटले जाते. अमरावती जिल्ह्यात असलेल्या या चिखलदऱ्याचे सौंदर्य पावसाळ्यात खुलून दिसत असते. हिरवेगार जंगल, पसरलेली धुक्याची चादर पर्यटकांना आकर्षित करीत असते. त्यामुळे येथील निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी केवळ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील पर्यटक गर्दी करीत असतात.