महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कसबेगव्हान शेत शिवारात दिसला वाघ, गावात दवंडीद्वारे सतर्कतेचा इशारा - tiger seen at kasbegavhan village

कसबेगव्हान शेत शिवारात एका शेतकऱ्याला भुरट्या रंगाचा वाघ शेतात संचार करताना आढळल्याने गावकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभाग आणि सर्व यंत्रणेला माहिती देण्यात आली. त्यानुसार त्या ठिकाणी सर्व चमू उपस्थित झाली आणि वाघाच्या ठसे तसेच इतर माहिती घेणे सुरू झाले.

amravati
कसबेगव्हान परिसरात आढळला वाघ

By

Published : Dec 11, 2019, 12:22 PM IST

अमरावती -जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी तालुक्याच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या कसबेगव्हान गावाच्या शेत शिवारात सोमवारी काही शेतकऱ्यांना वाघ दिसला. यामुळे, गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागात दाखल होऊन पाहणी केली असता वाघ असल्याचे स्पष्ट पुरावे आढळले नाहीत. मात्र, या भागात लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. तसेच स्वरक्षणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काळजी घेण्यास सांगितले.

कसबेगव्हान परिसरात आढळला वाघ

कसबेगव्हान शेत शिवारात बाळासाहेब थोरात यांचे शेतात त्यांना एक भुरट्या रंगाचा वाघ शेतात संचार करताना दिसला. त्यांनी ही घटना तेथील शशिकांत मंगळे यांना सांगितली असता मंगळे यांनी लगेच वनविभाग आणि सर्व यंत्रणेला कळविले. त्यानुसार त्या ठिकाणी सर्व चमू उपस्थित झाली आणि वाघाच्या ठसे तसेच इतर माहिती घेणे सुरू झाले.

हेही वाचा - अमरावती: भवानी मंदिर परिसरातील लोकांचे आयुष्य 'धुळीत'...

वाघ कुठल्या दिशेने गेला हे थोरात यांनी सांगितले परंतु, संध्याकाळ झाली असल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व शोध घेऊ व या परिसरावर लक्ष ठेऊ असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितले आहे. गावात ध्वनिक्षेपकाद्वारे मुनादी (दवंडीद्वारे सतर्कतेचा इशारा) देण्यात आली आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी शेतात काम करताना सतर्कता बाळगा असे आवाहन शशिकांत मंगळे यांनी केले.

हेही वाचा -अमरावती: रेल्वे मार्गावर आढळला आमदार देवेंद्र भुयार यांच्या जावयाचा मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details