अमरावती - बंगालच्या उपसागरात "निवार" नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाउस पडणार असल्याचा अंदाज अमरावतीच्या शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूतील मलापुरमजवळ भूभागावर तीव्र चक्रीवादळाच्या रूपात धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाचा वेग प्रति तास १२० किमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात आजपासून २७ तारखेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भात आजपासून तीन दिवस पावसाचा अंदाज; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने परिणाम - विदर्भात पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात "निवार" नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूतील मलापुरमजवळ भूभागावर तीव्र चक्रीवादळाच्या रुपात धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाचा वेग प्रति तास १२० किमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात आजपासून २७ तारखेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिणाम
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२७ तारखेला या जिल्ह्यात पाऊस
२७ तारखेला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ३० नोव्हेंबरपर्यंत विदर्भात कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे खरीप व रब्बी हंगामातील दोन्ही पिकांना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणामध्ये मोठा फटका
तामिळनाडूमध्ये वादळ धडकणार असल्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनाही वादळाचा मोठा फटका बसणार असून या तीन राज्यातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.