अमरावती- मध्यप्रदेशातील गुडी गावात रस्त्यावरील चरणाऱ्या दोन शेळ्या चोरून तिघेजण धारणी मार्गे परतवाडाकडे जात होते. या चोरांना धारणी पोलिसांनी आणि हरिसाल येथील नागरिकांनी चारचाकीसह पकडले. या कारवाईनंतर बकऱ्या चोरट्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील आरोपी सुरज आनंदराव हिवराळे, प्रदीप बाबुराव हिवराळे (ता. खामगांव, बुलडाणा), प्रमोद रामचंद्र निंबाळकर (रा. बाळापूर, ता. खामगाव, बुलडाणा) हे तिघे त्यांच्या चारचाकीने मध्य प्रदेशातील गुडी गावातून रस्त्यावर चालणार्या दोन शेळ्या कारमध्ये उचलून घातल्या आणि पळ काढला. पळून जात असताना शेखपुरा येथील कलीम मोहम्मद यांना आढळून आले. त्यांनी तत्काळ धारणी येथील पोलीस कर्मचारी सचिन होले यांना दूरध्वनीवरून या घटनेची माहिती दिली. कलीम मोहम्मद यांनी गुढी पासून आरोपींचा पाठलाग करत धारणीकडे आले. दरम्यान, आरोपीने भरधाव वेगाने देडतलाई येथील गेट पास करून धारणीपर्यंत पोहोचले तेथे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपीने त्यांच्या सुद्धा अंगावर गाडी घालून तेथून पळ काढला. तर धारणी शहरातून सुद्धा रस्त्यावर असलेल्या अनेक नागरिकांना कट मारून परतवाडा मार्गाकडे आपला प्रवास सुरू ठेवला. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना हरिसाल गावाजवळ वनविभागाच्या गेटवर नाकाबंदी करून आरोपीला रोखण्याची माहिती दिली.
हेही वाचा - 'नव्या अविष्कारासह चांगली मुल्येही नव्या पिढीत रुजवणे गरजेचे'