अमरावती - प्रियकराकडे लग्नाची मागणी करणाऱ्या गर्भवती प्रेयसीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ही घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लग्नाअगोदर गर्भवती असल्याचे कळताच नवऱ्याने दिला घटस्फोट, प्रेयसीने लग्नाचा तगादा लावताच प्रियकराने पाजले विष - अमरावती
एका तरुणीला किती यातना सहन कराव्या लागल्या? याची प्रचिती अमरावतीत घडलेल्या या घटनेतून पाहायला मिळाली.
आरोपी आणि पीडितेची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामधून तरुणीला गर्भधारणा झाली. अशातच त्या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न झाले. मात्र, मुलगी गर्भवती असल्याचे कळताच त्या मुलाने घटस्फोट घेतला. त्यानंतर पीडित तरुणीने पूर्वीच्या प्रियकराकडे लग्नाची मागणी केली. मात्र, त्यानी लग्नास नकार देऊन तरुणीचा गर्भपात केला. तसेच तिला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. याप्रकरणी सुधीर नारायण पातूरकर, विकास पातूरकर, नारायण पातूरकर यां तिघांना अटक करण्यात आली आहे.