महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत रात्र चोरांची! परतवाडामध्ये ज्वेलर्स शॉप फोडले; 60 लाखाचे दागिने लंपास - शसस्त्र दरोडा

ईश्वरदास पन्नालाल अग्रवाल सराफा दुकानामध्ये चोरी झाली. ही घटना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

परतवाडामध्ये सोन्याच्या दुकानात चोरी

By

Published : Aug 25, 2019, 10:41 AM IST

Updated : Aug 25, 2019, 12:31 PM IST

अमरावती- जिल्ह्यातील परतवाडा शहर मागील काही महिन्यांपासून चोरी व दरोड्यांच्या घटनांनी हादरून गेले आहे. त्यानंतर आज एक चोरीची घटना घडली आहे. परतवाडा शहरातील सदर बाजार परिसरात असणाऱ्या ईश्वरदास पन्नालाल अग्रवाल सराफा दुकानामध्ये चोरी झाली. ही घटना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून तबल 50 ते 60 लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.

परतवाडामध्ये ज्वेलर्स शॉप फोडले

चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. तर मागील काही महिन्यांपूर्वीसुद्धा एका मिल व्यावसायिकाच्या घरी शसस्त्र दरोडा पडला होता. त्यातच आजच्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Last Updated : Aug 25, 2019, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details