अमरावती- चार महिन्यांपूर्वी चांदूरबाजारातील एका सराफाच्या दुकानातून चोरट्यांनी तब्बल ३२ लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी अमरावती ग्रामिण पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपीच्या माहितीवरून पोलिसांनी मुंबईतील अंबरनाथ येथील एका सुवर्णकाराकडून सात किलो चांदी आणि शंभर ग्रॅम सोन्यासह साडेसात लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पंकज सिंह दूधानी याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
अमरावती: अंबरनाथमधील सुवर्णकाराकडून चोरीच्या सात किलो चांदीसह दागिने जप्त
चार महिन्यांपूर्वी चांदूरबाजारातील एका सराफाच्या दुकानात झालेल्या चोरीत ३२ लाख रुपयांचे दागिने लंपास झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे अंबरनाथ येथील एका सुवर्णकाराकडून सात किलो चांदी आणि शंभर ग्रॅम सोन्यासह साडेसात लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
चोरीचे दागिने अंबरनाथमधील सुवर्णकाराकडून जप्त
दरम्यान, चांदूरबाजार येथील ज्वेलरीमध्ये आठ ऑगस्टला चोरी झाली होती. यावेळी चोरट्यांनी दुकानातील दागिने लंपास केले होते. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांचे पथक अटकेतील चोरट्याला घेऊन अंबरनाथला गेले होते. चोरट्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना ऐवज जप्त करण्यात यश आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि परतवाडा पोलिसांनी केली आहे.