महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परतवाडा येथे दुकानांचे शटर बंद, व्यवहार मात्र सुरुच

राज्यात लॉकडाऊन असतांनाही परतवाडा-अचलपूर शहरात दुकानदारांनी दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेवून व्यवहार चालू ठेवल्याचा प्रकार घडत आहे.

दुकानांचे अर्धे शटर ऊघडे ठेवून व्यवहार चालू
दुकानांचे अर्धे शटर ऊघडे ठेवून व्यवहार चालू

By

Published : Apr 18, 2021, 7:59 PM IST

अमरावती- सध्या संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. मात्र जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरातील लहान-मोठ्या दुकानदारांनी दुकानांचे अर्धे शटर उघडे ठेवून प्रशासन व कोरोनाला वाकुल्या दाखविल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार घडत आहे. तसेच जिल्ह्यात पालिकेचे पथकही फिरताना दिसत नाही. दुकानांचे अर्धे शटर उघडलेले व आत ग्राहक असल्याचा कारभार जुळ्या शहरात पाहायला मिळत आहे.

परतवाडा येथे दुकानांचे शटर बंद, व्यवहार मात्र सुरुच
परतवाडा-अचलपुरात संचारबंदीतही दुकाने सुरुच
राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यासाठी राज्यशासनाच्या वतीने कठोर पावले उचलण्यात आली आहेत. अमरावती शहरात अंत्यविधी करण्यासाठीही जागा मिळत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. परंतु असे असतांनाही जिल्ह्यातील परतवाडा शहरात नियमांची पायमल्ली होत आहे. परतवाडा शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या जयस्तंभ चौकपासून ते प्रमुख मार्गावरील दुराणी चौक, सदर बाजार, गुजरी हार्डवेअर, कापड व्यावसायिक दुकानाचे शटर अर्धे बंद ठेऊन व्यवहार सुरू ठेवत आहेत.
शटर डाऊन परंतु ग्राहक आत -
औषधी व अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने वगळून सर्व दुकाने व सेवा बंद ठेवण्याचा शासणाचा आदेश आहे. परंतु, काही ठिकाणी अर्धे शटर उघडून बाहेर एक माणूस बसविण्यात आला व तो दुकान सुरू असल्याचे ग्राहकांना सांगत असल्याचेही दिसून आले. दुकानात ग्राहक, परंतु अर्धे शटर ऊघडे असा हा प्रकार सर्रास पाहायला मिळत आहे.
कारवाई करणारे पथक बेपत्ता -
कोरोना काळात काटेकोर नियम पाळण्यासाठी नगरपालिका, महसूल आदी जवळपास विविध विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत. दुकाने उघडी दिसताच कारवाई करण्याचे त्यांना अधिकार आहेत. अचलपूर नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी आठवड्याच्या सुरुवातीला पाच दुकाने सील केली होती. परंतु आता पथक दिसत नाही किंवा पथकाने कारवाई केल्याचेही समजले नाही. यामुळे पथक बेपत्ता असल्याची शहरात चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details