महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पक्ष सोडण्याच काम 'कपटी' माणूसच करू शकतो - आमदार यशोमती ठाकूर - आमदार

माझे वडील, माझे आजोबा काँग्रेसमध्ये होते. १९७८च्या काळातही काँग्रेसमधील परिस्थिती फार चांगली नव्हती.

आमदार यशोमती ठाकूर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधताना.

By

Published : Jul 14, 2019, 3:25 PM IST

अमरावती - आपला पक्ष हा आपल्या आई वडिलांसारखा असतो, त्यामुळे पक्ष सोडण्याचे काम हा 'कपटी' माणूसच करू शकतो, असे म्हणत काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

आमदार यशोमती ठाकूर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधताना.

मी काँग्रेस परिवारातील आहे. माझे वडील, माझे आजोबा काँग्रेसमध्ये होते. १९७८च्या काळातही काँग्रेसमधील परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यावेळेसही विभाजन झाले होते. आम्ही मूळ विचाराचे राजकारण आणि समाजकारण करत असतो. कुणाला संशय येत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. अनेक वेळा मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला आहे. मलाही पक्षांतर करण्यासाठी आमिष देण्यात आले. मला जायचे असते तर मी केव्हाचीच गेली असती. काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिले त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ठाकूर म्हणाल्या. आज अमरावतीमध्ये त्या 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होत्या.

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल बोलत असताना त्या म्हणाल्या, खूप जबाबदारी आहे. ज्या विपरीत परिस्थितीमध्ये जबाबदारी मिळाली आहे, ती स्वीकारून शक्य ते संघटनात्मक बदल करणार आहे. समोर विधानसभा निवडणुकीचे आमच्या समोर मोठे आव्हान आहे. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची तुलना विधानसभा निवडणुकीशी करता येणार असेही त्यांनी सांगितले. मागील निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून 80 च्या वर जागा आम्ही जिंकल्या होत्या. आता त्यापेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


भाजपकडून सत्तेचा आणि पैशाचा दुरुपयोग करून संविधानाला तोडण्याचे काम होत आहे. निवडणुकीच्या काळात मी कर्नाटकमध्ये असताना कशाप्रकारे आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला हे मला माहित आहे. तसेच सत्ताधारी यांच्याविरोधात बोलले तर त्यांना नेस्तनाभूत करायचे काम केले जात असल्याचेही आमदार ठाकूर म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details