अमरावती - शहरात झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी (Curfew) लावण्यात आली. यावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. याकरिता इतर जिल्ह्यातील मोठा पोलीस बंदोबस्त शहरात आला व त्या पोलिसांची चार दिवसांपासून जेवणाची, पाण्याची व्यवस्था एक सामाजिक व हॉटेल व्यावसायिक (Social and hotel business) करीत आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
Amravati Violence : हॉटेल व्यावसायिक दररोज करतोय बंदोबस्तातील पोलिसांच्या जेवणाची सोय - बंदोबस्तातील पोलिसांच्या जेवणाची सोय
कोरोना काळात गेले वर्ष दीड वर्ष त्यांनी सातत्याने जेवणाचा हा उपक्रम सातत्याने राबविला होता. बाहेर गावावरून परत घरी जाणाऱ्या अनेक नागरिकांना ते दररोज जेवनाचा डब्बा पार्सल करून देत असत. सामाजिक कार्यात नितीन कदम हे नेहमीच अग्रेसर असतात. संचारबंदीच्या काळात दररोज जेवणाची व्यवस्था करण्यात येणाऱ्या नितीन कदम यांचा हा उपक्रम बघून बंदोबस्तासाठी आलेले बाहेर जिल्ह्यातील पोलीस ही भारावून गेले आहेत.
शुक्रवारी दुपारी अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Amravati Violence) झाला. या हिंसाचारात शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शहरात संचारबंदीही लावण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलीस दल (Additional police force) शहरात बोलविण्यात आला. पोलिसांनी परिस्थिती हाताळल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र शहरात बंदोबस्तसाठी आलेल्या पोलिसांना जेवणाची व्यवस्था शहरातील एक सामाजिक कार्यकर्ता व हॉटेल व्यावसायिक नितीन कदम (Nitin Kadam) गेल्या चार दिवसांपासून करीत आहे. जेवणाचे पार्सल व पाण्याची बॉटल हे शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या 2 हजार पोलिसांना ते दररोज पुरवीत आहे. एवढेच नाही तर जेवणात काय कमी जास्त आहे हे सुद्धा नितीन मायेने पोलिसांना विचारतात.
कोरोना काळात (Covid19) गेले वर्ष दीड वर्ष त्यांनी सातत्याने जेवणाचा हा उपक्रम सातत्याने राबविला होता. बाहेर गावावरून परत घरी जाणाऱ्या अनेक नागरिकांना ते दररोज जेवनाचा डब्बा पार्सल करून देत असत. सामाजिक कार्यात नितीन कदम हे नेहमीच अग्रेसर असतात. संचारबंदीच्या काळात दररोज जेवणाची व्यवस्था करण्यात येणाऱ्या नितीन कदम यांचा हा उपक्रम बघून बंदोबस्तासाठी आलेले बाहेर जिल्ह्यातील पोलीस ही भारावून गेले आहेत.