महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षक दिन विशेष : अँड्रॉइड फोन नसल्यामुळे अंजलीसाठी रात्रीचा वर्ग; शिक्षिकांचा 'आदर्श' उपक्रम - anjali gaurkar borgaon dharmale

कोरोनामुळे ऑनलाइन सुरू झालेल्या अभ्यासक्रमासाठी अँड्रॉइड फोन घरी असणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्येकाला फोन उपलब्ध होईल असे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षक दिन विशेष  आदर्श शाळा अमरावती  अंजली गौरकर बोरगाव धर्माळे  teachers day special  anjali gaurkar borgaon dharmale  borgaon dharmale amravati news
शिक्षक दिन विशेष : अँड्रॉइड फोन नसल्यामुळे अंजलीसाठी रात्रीचा वर्ग; शिक्षिकांचा 'आदर्श' उपक्रम

By

Published : Sep 5, 2020, 8:10 AM IST

Updated : Sep 5, 2020, 12:58 PM IST

अमरावती -घरची परीस्थिती हलाकीची. वडील 15 किमी अंतरावर अमरावती शहरात कठोरा नाका येथील किराणा दुकानात काम करतात. त्यातही त्यांना वेतन कमी. वडिलांकडे साधाच मोबाईल फोन. अशातच कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले अन् तिच्यासमोर शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. पण, तिच्या जिद्दीने आणि शाळेतील शिक्षिकांच्या मदतीने हा प्रश्नही सुटला. शिक्षिका साध्या फोनवरूनच तिचा अभ्यास घेतात, तेही रात्रशाळेत खास वर्ग भरवून. ही कहाणी आहे, बोरगाव धर्माळे गावातील विद्यार्थिनी अंजली गौरकरची...

शिक्षक दिन विशेष : अँड्रॉइड फोन नसल्यामुळे अंजलीसाठी रात्रीचा वर्ग; शिक्षिकांचा 'आदर्श' उपक्रम

अंजली नंदू गौरकर ही अमरावती शहरातील खापर्डे बगीचा परिसरात असणाऱ्या आदर्श शाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आहे. अमरावती शहारापासूम 15 किमी अंतरावर असणाऱ्या वडगाव माहुरे या गावात ती राहते. अंजलीचे वडील अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरात असणाऱ्या एका किराणा दुकानात 6 हजार रुपये वेतनावर काम करतात. त्यामुळे ते मुलीच्या शिक्षणासाठी अँड्राइड घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे साधाच फोन आहे. ते सकळी 9 वाजता घरून निघाले की रात्री ७ वाजताच घरी परतात. सध्या कोरोनामुळे ते सायंकाळी 7पर्यंत घरी परततात.

अंजलीच्या शाळेतील शिक्षिका सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान इतर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेतात. मात्र, घरी अँड्रॉइड फोन नसल्यामुळे अंजली या वर्गात उपस्थित राहू शकत नाही. पण, ती मुळातच हुशार आणि गुणी विद्यार्थिनी आहे. विशेष म्हणजे 'नाळ' या चित्रपटात चैत्याची मैत्रीण देवीच्या भूमिकेसाठी सर्वात आधी अंजलीची निवड झाली होती. मात्र, कौटुंबीक कारणामुळे अंजलीच्या पालकांनी नकार दिल्याने अंजलीची मोठी संधी हुकली होती. यासोबतच अंजली अभ्यासामध्ये हुशार आहे. तिच्यामध्ये असणारे कलागुण आणि अभ्यासाची आवड पाहता शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल विरुळकर, वर्गशिक्षिका रुपाली जोशी, मराठी विषयाच्या शिक्षिका कीर्ती कोहळे, विज्ञानाच्या शिक्षिका अश्विनी कुळकर्णी, सामाजिक शास्त्राच्या राधिका सिद्धभट्टी आणि गणिताच्या शितल केने या सर्व शिक्षकांची ती आवडती विद्यार्थिनी आहे. त्यामुळे सर्व शिक्षिका ठरलेल्या वेळेत रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान अंजलीशी संवाद साधतात. तिला अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवून मार्गदर्शन करतात.

काही महत्वाचे असेल तर अंजलीच्या घरासमोर किराणी दुकान चालविणाऱ्या प्रज्वलच्या फोनवर शिक्षिका माहिती पाठवतात. तो देखील अंजलीला मदत करतो. शिक्षिकांच्या पुढाकारामुळे अंजली आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकत आहे. त्यामुळे तिने सर्वांचे आभार मानले. गावात मंदिर नसलं तरी चालतं पण शाळा हवी, अशी भावना अंजलीने व्यक्त केली आहे.

Last Updated : Sep 5, 2020, 12:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details