महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा, यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - यशोमती ठाकूर

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदराचे उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तरी या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्वरित निलंबन करण्यात यावे, अशी मागणी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यशोमती ठाकुर
यशोमती ठाकुर

By

Published : Mar 26, 2021, 9:51 PM IST

अमरावती - मेळघाट येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

दिपाली चव्हाण यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून दि. २५ मार्च, २०२१ रोजी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदराचे उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तरी याप्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्वरित निलंबन करण्यात यावे, अशी मागणी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर या आत्महत्या प्रकरणात दोषींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री ठाकूर यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

यशोमती ठाकूर
'विशाखा समित्या तत्काळ कार्यरत करा'
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार राज्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समित्या स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहे. जर कुठे या समित्या कार्यान्वित नसल्यास तर त्याठिकाणी तातडीने पंधरा दिवसांच्या आत कार्यान्वित करा. तसेच या समित्यांच्या नियमित बैठका घेऊन महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात यावे, असे निर्देशही यशोमती ठाकूर यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
'संकटग्रस्त महिलांनी थेट संपर्क साधावा'
लैंगिक, मानसिक छळाची समस्या असल्यास महिलांनी आपल्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही मंत्री ठाकूर यांनी महिलांना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details