अमरावती- शहरात हैदरपुरालगतच्या नुराणी चौक परिसरात आज एक ऑटो चालक अचानक दगावल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असले तरी त्याच्या कुटूंबातील सदस्यांना पोलिसांनी क्वारंटाईन केले आहे.
ऑटोचालक दगावल्याने नुराणी चौक परिसरात खळबळ; कुटुंबीय क्वारंटाईन
मृताच्या हृदयावर काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचे वय 50 वर्षे होते. काही दिवसांपासून त्याला बरे नसल्याने कोरोना असावा असा संशय परिसरातील नागरिक घेत होते. आज अचानक त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

नागपुरीगेट पोलिसांनी मृताच्या पत्नीसह त्याच्या दोन मुलांना होम क्वारंटाईन केले आहे. मृताच्या अंत्ययात्रेतही पाचपेक्षा अधिक जणांना सहभागी होता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ऑटोचालकाचा मृत्यू मात्र नेमका कशाने झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही.