अमरावती- जिल्ह्यातील चांदुर रेल्वेच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना महाविद्यालयाने प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती. दरम्यान, शपथीच्या माध्यमातून विद्यार्थिनी या जनजागृतीचा प्रयत्न करत होत्या, असे मत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
'..त्या विद्यार्थिनींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेऊन जनजागृतीचा प्रयत्न केला' - student oath case chandur railway
विद्यार्थिनींना दिलेल्या शपथीवरून राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सावध भूमिका घेतली आहे. तसेच, कुणी काय शपथ घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येकाला वैयक्तिक स्वतंत्र्य आहे. कसे राहायचे कसे वागायचे तो त्यांचा प्रश्न आहे, असे मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.
विद्यार्थिनींना दिलेल्या शपथीवरून राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सावध भूमिका घेतली आहे. तसेच, कुणी काय शपथ घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येकाला वैयक्तिक स्वतंत्र्य आहे. कसे राहायचे कसे वागायचे तो त्यांचा प्रश्न आहे. त्या विद्यार्थिनींना जर वाटत असेल की शपथ घेतल्याने संरक्षण होत असेल म्हणून त्यांनी शपथ घेतली असावी, असेही महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
हेही वाचा-प्रेमविवाह न करण्याच्या 'त्या' शपथेवर पंकजा मुंडेंना संताप; म्हणाल्या...